देवगड : मागील 15 दिवसापूर्वी बापर्डे येथील घरातून बेपत्ता झालेल्या प्रतिभा प्रकाश दुसणकर (55) या महिलेचा सडलेल्या स्थितीत मृतदेह रविवारी सकाळी बापर्डे डाेेकांबा व्हाळाच्या पाण्यात सापडला आहे.
बापर्डे हेदाडवाडी येथील प्रतिभा प्रकाश दुसणकर या महिलेची मनस्थिती बिघडलेली हाेती याच स्थितीत 22 जुलै राेजी सकाळी 7.30 वा.सुमारास ती घरातून निघून गेली.तिचा मुलगा बाळकृष्ण यांनी शाेधाशाेध केली मात्र आपल्याआईचा शाेध न लागल्याने त्यांनी देवगड पाेलिसस्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली हाेती.
रविवारी सकाळी बाळकृष्ण हाआईचा शाेध घेतअसताना बापर्डे डाेेकांबा व्हाळाकडे त्यांना कुजकटवास येवू लागल्याने त्यांनी पाण्याचा दिशेने जावून शहानिशा केली
यावेळी पाण्यात सडलेल्या स्थितीतएका महिलेचा मृतदेह दिसला.ताे मृतदेह बेपत्ताआईचाचअसल्याचीओळख पटली असून याबाबत देवगड पोलीस स्थानकात कळविल्यानंतर पाेलिस हवालदार राजन जाधव आणि पाेलिस कर्मचारी यांनी घटना स्थळी जावून सडलेल्याअवस्थेत पाण्यातअसलेल्या मृतदेह ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढला.पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.