मळई खाडीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह!

देवगड : तालुक्यातील मळाई खाडी किनारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खाडीकिनारी राहत असलेल्या व्यक्तीला अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याची बाब निदर्शनास येतात स्थानिक माजी नगरसेवक उमेश कणेरकर यांच्या लक्षात आणून देताच घटनास्थळी धाव घेत घटनेची शहानिशा केली असता सदर मृतदेह महिलेचा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी स्थानिक पोलिसांना याची खबर देताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कोणाचा याची शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे.