मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे कालपासून परदेश दौऱ्यावर असून त्यांनी दक्षिण कोरियामधील
CJ लॉजिस्टिकच्या वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत साऊथ कोरिया मध्ये बैठक पार पडली. त्यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचा उद्योग महाराष्ट्रात येऊन उद्योग क्षेत्रात भर पडण्यासाठी योगदान देण्याची यावेळी विनंती केली. उद्योगमंत्री यांच्या विनंतीला नक्कीच मान ठेवत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात गुंतवणूकी बाबत विचार करण्याचा शब्द दक्षिण कोरियामधील अधिकारी वर्गाने उद्योगमंत्री यांना दिला आहे.
यावेळी उद्योग विभाग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ MIDC विपीन शर्मा आणि MIDC अन्य अधिकारी तसेच कंपनीच्यावतीने कंपनी उपाध्यक्ष श्री. जोसेफ आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.