सावंतवाडी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आलेली होती, त्यामधील आरोपी क्र.४ पायबा दशरथ गवाडे, रा. घाडीवाडी, मडखोल व आरोपी क्र.५ संदीप मधुकर गावडे, रा. मलशिनेवाडी, सांगेली यांना ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी क्र. ४ पायबा गावडे याने फिर्यादी ही बागेत गुरे चरविण्यासाठी गेली असता तीचा हात पकडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी क्र. ५ संदीप गावडे याने फिर्यादी हिला आपल्याशी लग्न करण्यासाठी धमकावत असल्याबाबत फिर्यादी हिने तक्रार दिलेली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलिस ठाणे येथे आरोपी यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३५३,३५४,३५४(अ),३५४(ड),५०६,३७६ F,I, J, N सह POCSO ॲक्ट २०१२ चे कलम ४,६,८,१२,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी यांना दि. ०२/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपी यांना ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे समोर हजर केले असता,याकामी आरोपी याच्या तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी फिर्यादी हिच्या तक्रारी नुसार सदर प्रकारणी POCSO कायद्याचे कलम लागु होत नसुन आरोपी यांना पोलीस कोठडी मंजुर करू नये असा युक्तिवाद केला ॲड. निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून येथील न्यायालयाने आरोपी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली होती, त्यानुसार आरोपी यांच्यातर्फे ॲड. निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता, त्यानुसार ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायाधीश साहेब श्रीम. सानिका जोशी यांनी ॲड.निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी याची जाचक अटी घालून रक्कम रु. २५,०००/- च्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश केलेला आहे. याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.