आश्चर्यकारक… होडावडे येथे आढळली रात्री चमकणारी अळंबी ; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद.

सिंधुदुर्ग :  महाराष्ट्रातील पहिलीच चमकणारी अळंबीची नोंद जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गात झाली आहे. या अगोदर चमकणारी अळंबी केरळ राज्यात आढळली होती, त्यानंतर दुसरी नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अगोदर चमकणारी बुरशी आढळली होती तीही तिलारी खोऱ्यात. मात्र आता चमकणारी अळंबी आढळली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ ‘बायोलुमिनिकन्स फंगी’ म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे.