गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई!

बांदा : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याबद्दल कुडाळ येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ५० हजाराच्या दारूसह ६ लाख ४२ हजाराची गाडी असा मिळून १३ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी इन्सुली खामदेव नाका परिसरात करण्यात आली. विजय रमाकांत माने ( रा. शिरसोसवाडी नेरूर, ता. कुडाळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. कागदी पुठ्ठ्याच्या आत दारू लपवून ही वाहतूक करण्यात येत होती.

सदर कारवाई संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, तानाजी पाटील व प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, स. दु. नि.दीपक वायदंडे, जवान, व रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास प्रदीप रास्कर , दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.