गोगटे -वाळके महाविद्यालयात पाककला स्पर्धा संपन्न!

बांदा : गोगटे वाळके महाविद्यालयात बांदा येथील महिला विकास कक्षाच्या वतीने नुकतीच पाककला स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनशीलतेला गती देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील महिला विकास कक्षाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सक्षमता, धैर्य ,कला कौशल्य आदी गुण विकसित व्हावेत म्हणून हा विभाग वर्षभर कार्यरत राहतो. त्यातीलच एक उपक्रम म्हणून परिसरातील रान भाज्यांचा वापर करून पाककृती कला कौशल्यपूर्णरीतीने करावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा सावंत (प्रथम वर्ष कला), द्वितीय क्रमांक मधुरा महाबळ( प्रथम वर्ष कला), तृतीय क्रमांक इशा सावंत (तृतीय वर्ष वाणिज्य )आणि उत्तेजनार्थ मृणाल परब व ऋतुजा चव्हाण (तृतीय वर्ष वाणिज्य) यांनी प्राप्त केला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. महाले व प्रा. डॉ. के. के. म्हेत्री यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेचे संयोजन सौ. प्रा. रश्मी यांनी केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी केले.