युवतीवर जीवघेणा हल्ला ; वेंगुर्ला तालुक्यातील एका गावातील वाद पेटला..!

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील घोडेमुख पेंडुर येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती.यात दोन्ही गटातील प्रत्येकी मिळून 6 जण जखमी झाले असून जखमीवर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या जखमी पैकी युवतीवर घरात घुसुन एका केलेल्या हल्यात डोक्यावर कोयत्याने घाव घातल्याने सदर युवतीला तब्बल 27 टाके पडले आहेत.एकूण 9 संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही वेंगुर्ला पोलीस करत असून यातील 6 जण उपचार घेत आहेत.हाणामारीमधील वापरलेली काही वस्तू पोलिसांनी जप्त केली. असून ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना उद्या वेंगुर्ला न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता आहे.दोन्ही गटातील संशयित आरोपींवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे