देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी मुख्य आरोपीवर गोळीबार करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात असताना पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने पोलिसांवर गोळी चालवली. नंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. पुढे त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे”. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.