बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत. त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालादेखील गोळी लागली असून तो देखील गंभीररित्या जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.