महावितरणाचा भोंगळ कारभार, ३ दिवस वीज खांब कोसळून जैसे थे ; नागरिकांमध्ये व्यक्त होतोय रोष..!

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे लिंगेश्वर मंदिर नजीक जाणारा समुद्रावरील रस्ता मागील तीन दिवस लाईटचा पोल पडल्याने बंद आहे. एकीकडे सुप्रसिद्ध असे जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्र पर्यटकांसाठी महत्त्वाचे असे मानले जाते पण मागील तीन दिवस या ठिकाणी पोल पडल्याने व महावितरण अधिकाऱ्यांचे सतत सांगितल्यानंतरही दुर्लक्ष केल्याने पर्यटकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले. आज येथील मनसेचे माजी तालुका सचिव आबा चीपकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, शहराध्यक्ष निलेश देसाई, नंदू परब, मनोज कांबळे यांसहित पर्यटक उपस्थित होते.

दरम्यान महावितरणाच्या ह्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय.