२९ सप्टेंबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू : जिल्हाधिकारी

21

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) व (फ) ३७ (३) नुसार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी ००. ०१ वाजल्यापासून ते दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी २४. ०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे घोषीत केले आहे.