बांदा येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या काका व पुतण्याचे एकाच दिवशी अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी पुतण्या नारायण यशवंत सावंत-पटेकर (वय ३४) यांचे तर सायंकाळी उशिरा काका सुरेश रामचंद्र सावंत-पटेकर (वय ७४) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. काका पुतण्याचे निधन झाल्याने पटेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नारायण यांच्या मागे आई, वडील, पत्नी, १० महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. तर सुरेश सावंत यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.