ACCIDENT- दुचाकी व कारची समोरासमोर धडक ; दुचाकी चालक गंभीर जखमी..!

सावंतवाडी : शहरात दुचाकी व वॅग्नर कार यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री साडेदहा वाजता येथील गवळी तिठा परिसरात घडली. प्रसन्न नाईक (रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत वॅग्नर कारचे मालक समीर कावळेकर (रा. गरड) यांनी फिर्याद दिली आहे. कावळेकर यांच्या म्हणण्यानुसार ते उपरलकर देवस्थानाच्या ठिकाणी गेले होते. तेथून परतत असताना गवळी तिठा येथे अचानक दुचाकीस्वार आपल्या समोर आला व अपघात झाला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार पोलीस ठाणेत अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान याबाबत तपासिक अंमलदार सूरज पाटील यांनी ही माहिती दिली. दोन्ही चालक वेगवेगळी माहिती देत असल्यामुळे सीसीटीव्ही व प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्तास अपघाताची नोंद करण्यात आली आहे, अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.